मडगावात ७० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

0
54

मडगाव शहरातील वाढत्या चोर्‍या, घरफोड्या व त्यात गुंतलेले संशयित गुन्हेगार यांचा वावर गांधी मार्केटपासून जुने व नवीन रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे दिसून आल्याने काल रात्रौ त्या परिसरात संशयास्पदरित्या फिरणार्‍या ७० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मडगाव पोलीस, कोकण रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा पोलिसांनी एकत्रितपणे ही मोहीम चालविली.

गेल्या कित्येक महिन्यापासून जुने रेल्वे स्टेशन हे गुन्हेगारांचा अड्डा व अनैतिक व्यवसायाचे केंद्र बनले होते. त्याचा फटका अनेकांना बसला होता.