मडगाव नगरपालिका मंडळाच्या मडगाव कार्निव्हल समितीतर्फे यंदा रविवार दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी कार्निव्हल साजरा करण्यात येणार आहे. रविवार दि.१५ रोजी सायंकाळी चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येईल. मडगाव कार्निव्हल समिती व गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे साजरा करण्यात येईल. या चित्ररथ मिरवणुकीच्या समारंभाला पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर, मजूरमंत्री आवेर्तन फुर्तादो व ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको उपस्थित राहतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मिरवणुकीत सहभागी चित्ररथांना एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

