या विषयी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी बिगर सरकारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी नागू बारवर छापा टाकला. त्या बारलगत चार–पाच खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालू होता. पोलिसांनी छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. त्यावेळी तेथे आठ जणांपेक्षा जास्ती ग्राहक होते.
त्यापैकी चौघेजण पळून गेले. लगेच बार मालक अशोक खांडेकर, व्यवस्थापिका रेश्मा मुजावर, महिलांचा पुरवठा करणारा व ग्राहक शोधणारा दलाल पिंप उर्फ महजद शरीफ, ग्राहक मोटू कुमार (बिहार), रामकुमार (उत्तरप्रदेश), अफजल सरकार (पं. बंगाल), अर्जुन नाईक (सावर्डे) यांना अटक केली. बारमध्ये रोख १७५०० रुपये सापडले.
ताब्यात घेतलेल्या चार महिलांना सुधारगृहांत पाठविण्यात आले असून आठ जणांना अटक केली आहे. या बारमध्ये बर्याच काळापासून वेश्याव्यवसाय चालू असूनही पोलिसांना त्याविषयी माहिती नव्हती. गेल्या चार महिन्यांमागे मडगाव येथील रस विक्री दुकानात धाड घालून तरुणी व ग्राहकांना अटक केली होती.

