Home बातम्या मडगावातील ‘एन मार्ट’ ग्राहकांनीच लुटले

मडगावातील ‘एन मार्ट’ ग्राहकांनीच लुटले

0

घोगळ मडगाव येथील ‘एनमार्ट’ या गृहपयोगी वस्तू व इतर सामानाच्या वस्तूंची विक्री करणार्‍या मॉलमध्ये काल ग्राहकांनी घुसून सर्व वस्तू लुटून नेल्या. मुंबई येथील ‘एन मार्ट’ कंपनीचे घोगळ येथे दुकान सुरू केले होते.

कंपनीने गेल्या तीन वर्षामागे घोगळ येथे मॉल सुरू केले व प्रत्येकी ४.५ हजार रुपये घेऊन ग्राहक तयार केले. तसेच प्रत्येकवेळी एक हजार रुपयांच्या खरेदीवर २०० रुपये सूट देण्याची योजना जाहीर केली होती. प्रत्येक ग्राहकाने नवीन सदस्य बनविल्यास त्यांना कमिशन देण्याचे आमिष दिले होते. अनेकांनी नवे सदस्य बनविले. पण कोणतेच कमिशन न मिळाल्याने ते संतापले. काल सायंकाळी उशीरा दुकानात घुसून सामानाची लुटमार केली. कंपनीचे दुकान ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात येणार असल्याची नोटीस लावली होती. त्यामुळे लोकांनी घाबरून पैसे मागितले. पण ते त्यांनी देण्यास नकार दिला. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता व्यवस्थापकाने योग्य उत्तरे दिली नाहीत.