मडगाव येथून धर्मापूर येथे जाताना रिक्षाची धडक समोरून येणार्या मोटरसायकलला बसून मोटरसायकलस्वार मेनुद्दीन शहा शबीर मकंदर (२०) हा ठार झाला. रविवारी रात्री मंगलदास तुकाराम माने हा आपली रिक्षा घेऊन धर्मापूर येथून मडगाव येथे जात होता. त्याने लक्ष्मी मार्केटजवळ कारला मागे टाकून पुढे वेगाने जाताना समोरून येणार्या मोटरसायकलला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात मेनुद्दीन हा खाली पडला व गंभीर जखमी झाला. त्याला इस्पितळात नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मडगाव पोलिसांनी रिक्षाचालक मंगलदास विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

