मडगावातच अंत्यसंस्कार करावेत ः दिगंबर कामत

0
183

मडगाव येथील कोविड-१९ इस्पितळात उपचार घेणार्‍या एखाद्या कोविड रुग्णाचे जर उपचाराच्या दरम्यान निधन झाले तर त्या मयत रुग्णाचे अंत्यसंस्कार मडगाव येथील हिंदू स्मशानभूमीत केले जावेत. यासाठी जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याबरोबर आपली व मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक यांची बैठक झाली. मयत कोविड रुग्णांवर आपल्या गावात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक लोकांकडून विरोध होऊ लागल्याप्रकरणी तोडगा काढल्याचे कामत म्हणाले.