मडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना

0
159

मडगाव रेल्वे स्टेशनवरून काल उत्तर भारतातील मजुरांना घेऊन दोन श्रमिक गाड्या रवाना झाल्या. दुपारी साडेबारा वाजता सोनभद्र-उत्तर प्रदेशात जाण्यासाठी सुमारे १ हजार मजुरांना घेऊन ट्रेन रवाना झाली. तर सायंकाळी ६ वाजता दिनापूर-नागालँडच्या मजुरांना घेऊन दुसरी गाडी सुटली. त्यात दिड हजारपेक्षा जास्ती मजूर होते.
नेहमीप्रमाणे सकाळपासून रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेशातील मजूरांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. त्यामुळे अधिकार्‍यांची धावपळ झाली. पोलिसांना सर्वांना नियंत्रणात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.