उत्तर प्रदेशच्या कामगारास अटक
मडकई येथील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात काल दुपारी १च्या दरम्यान ४ वर्षांच्या मुलीला चॉकलेट व पैशांचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून ईश्वर यादव बारी (२३) मूळ राहणार उत्तर प्रदेश या युवकाला फोंडा पोलिसांनी अटक केली.
अधिक चौकशी करिता त्याला उद्या रिमांड घेतला जाणार आहे.
सदर बालिका एका कामगाराचीच मुलगी असून आई-वडील कामाला गेल्याची संधी साधून औद्योगिक वसाहतीतच काम करणार्या युवकाने बालिकेला चॉकलेट दिले व हातात १० रुपयांची नोट देऊन जवळच्याच झाडीत नेऊन बलात्कार केला.
बालिकेला त्रास होऊ लागल्याने घरी आल्यावर आईला सांगितले तेव्हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना कळवल्यानंतर लागलीच हालचाल करून वरील युवकाला ताब्यात घेतला व वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा नोंदवला. निरीक्षक सी. एल्. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

