घाऊक प्रमाणात डिझेल खरेदी करणार्यांचे अनुदान केंद्र सरकारने रद्द केल्याने देशात मच्छिमारांत असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने हा घोळ का केला, हे कळणे कठीण आहे. या प्रश्नावर आपण केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे बोलणी केल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
कदंब महामंडळानेही खुल्या बाजारातून डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. खुल्या बाजारात डिझेल सध्या घाऊक दरापेक्षा स्वस्त आहे.
मच्छिमारी व्यवसाय कृषी क्षेत्राखाली येत असल्याने त्यांना अनुदान मिळालेच पाहिजे. गोमंतकीयांना मासळी महत्त्वाची आहे. डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रीय मच्छिमारी महासंघाने ‘मार्केट बंद’ पुकारला आहे. त्यामुळे गोमंतकीयांना मासळी मिळू शकली नाही, असे पर्रीकर म्हणाले.

