मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आदेश
2006 साली मंदार सुर्लकर या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन नंतर त्याचा खून करण्याची जी घटना घडली होती, त्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या रोहन धुंगट, रायन पिंटो व शंकर तिवारी या कैद्यांची कारागृहातून मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिले.
हा आदेश देताना गोवा खंडपीठाने दोषींनी कारागृहात भोगलेली शिक्षा, कारागृहातील वर्तणूक व लागू असलेल्या कायद्यातील नियमांच्या आधार घेतला. कायदा व नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वरील तिघांची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
2006 साली सदर आरोपींनी त्यांचा एक मित्र मंदार सुर्लकर याचे खंडणीसाठी अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याचा आरोप होता. त्यासाठी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
आपल्याच मित्राचे खंडणीसाठी अपहरण करुन नंतर त्यांची हत्या करण्याचे हे प्रकरण त्याकाळी गोव्यात बरेच गाजले होते. 17 वर्षांचा मंदार सुर्लकर हा दीपक सुर्लकर यांचा एकुलता एक मुलगा होता. आपल्या मुलाची हत्या केलेल्या आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा
दिला होता.

