Home बातम्या मंत्र्यांना वगळण्याच्या अफवा सरकार अस्थिर करण्यासाठीच

मंत्र्यांना वगळण्याच्या अफवा सरकार अस्थिर करण्यासाठीच

0

वरील वृत्त पसरवून भाजप पक्ष हा बहुजन समाजविरोधी आहे असे भासवणार्‍या षड्‌यंत्राचा तो भाग होता, असे तवडकर म्हणाले. मात्र, हे षड्‌यंत्र यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.

मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात एकही मंत्री अकार्यक्षम नसल्याचे तवडकर यांनी सांगितले. स्वतःविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण अत्यंत सक्रिय असे मंत्री आहोत. मंत्री बनल्यापासून अनुसूचित जमातींसाठीच्या १२ कल्याणकारी योजनांची आपण अंमलबजावणी केल्याचे ते म्हणाले. क्रीडा खात्याची कामेही जोरात चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षात असताना जो माणूस अत्यंत सक्रिय होता तो मंत्री बनल्यानंतर कसा निष्क्रिय बनेल, असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षात असताना आपण राज्यात अनुसूचित जमातींच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्याच्या कामी सिंहाचा वाटा उचलला होता, असे ते म्हणाले. सक्रीयपणे काम करण्याच्या आपल्या वृत्तीमुळेच आपण एक साधा कार्यकर्ता होतो, तो मंत्री बनल्याचे तवडकर यांनी सांगितले.