मंत्री नीलेश काब्राल यांच्या विधानाची चर्चा

0
8

जर राजकीय नेत्यांना जनतेला दिवसाला किमान 4 ते 5 तास पाणीपुरवठा करता येत नसेल, तर ते राजकीय नेते प्रशासन चालवण्यासाठी सक्षम आहेत असे म्हणता येणार नाही, असे विधान सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी काल केले. लोकांना 24 तास पाणी पुरवठा करणे हे लक्ष्य असायला हवे, असेही ते पुढे म्हणाले. पाणीपुरवठा विभाग हा साबांखाच्या अखत्यारितच येतो. हे खातेही काब्राल यांच्याकडेच आहे. त्यामुळे सदर विधान त्यांनी नेमके कोणाला उद्देशून केले याची चर्चा रंगू लागली आहे. काल विज्ञान चित्रपट महोसत्वाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. आगामी दिवसांत जनतेला आवश्यक तेवढ्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबतीत सरकारला निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यासाठी जनतेच्या पाठिंब्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.