मंकीपॉक्सप्रकरणी केंद्राच राज्यांना सतर्कतेचा इशारा

0
12

जगात आता कोरोनानंतर मंकीपॉक्सचा फलाव सुरू झाला आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्सचे १२ देशांत ९२ रुग्ण आढळून आले आहेत. हे सगळे रुग्ण ब्रिटन, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत इशारा दिला आहे. शारीरिक संबंधांमुळे मंकीपॉक्स माणसांमध्ये पसरत असल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डेव्हिड हेमॅन यांनी व्यक्त केली आहे. मंकीपॉक्स हा आजार कांजिण्यांसारखा आहे.

मात्र त्यापेक्षा कमी गंभीर असल्याची माहिती मुंबईतल्या चेंबूर येथील जैन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयाचे सल्लागार डॉक्टर आणि संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत शाह यांनी दिली. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात आरोग्य खात्यातर्फे दक्षता

आरोग्य खात्याने राज्यातील गोमेकॉ, सरकारी आणि खासगी इस्पितळांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने यासंबंधी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मंकीपॉक्समध्ये अजूनपर्यंत बळीची नोंद झालेली नाही. परंतु, मंकीपॉक्सची नवीन प्रकरणे विदेशातील अनेक देशात आढळून येत आहेत. आफ्रिका देशातील प्रवास आणि स्थानिक पातळीवरील फैलावामुळे मंकीपॉक्सची प्रकरणे जगभरात वाढत आहेत.