भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सहाय्यक निरीक्षकाची बदली

0
3

खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी पत्रादेवी येथील आरटीओ तपासणी नाक्यावरील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर तेथील एका साहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांची पणजी येथील उत्तर गोवा अंमलबजावणी विभागात बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला. पत्रादेवी तपासणी नाक्यावर परराज्यातून गोव्यात येणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून पैस घेतले जात असल्याचा आरोप ताम्हणकर यांनी केला होता.