भू-रुपांतरप्रकरणी दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात ः राणे

0
10

राज्यभरातल्या ज्या ज्या बाह्यविकास आराखड्यात काही लोकांनी आपल्या ङ्गायद्यासाठी भू-रुपांतरांसह ज्या अन्य काही बेकायदा गोष्टी केल्या होत्या त्यांचा छडा लावून त्यात आवश्यक त्या दुरूस्त्या करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल ट्विटद्वारे स्पष्ट केले.

नगर आणि नियोजन तसेच वनखात्यासंबंधीच्या तक्रारी करण्यासाठी आपला खाजगी ई-मेल देण्यासंबंधीच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना मंत्री राणे यांनी लोकांना सहजपणे व थेट आपणाशी संपर्क साधता यावा यासाठी आपण आपला खासगी ई-मेल दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या आवाहनाला अनुसरून राज्यातील लोकांनी मोठ्या संख्येने तक्रारी पाठवल्याबद्दल समाधान व्यक्त करून मंत्री राणे यांनी, बेकायदा गोष्टींविरूद्ध मोहीम उघडून कारवाई करण्याच्या आपल्या निर्णयाला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे, हे यावरून स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत बेकायदा गोष्टी घडू नयेत यासाठी लोकांच्या तक्रारींसह सर्व यंत्रणा ही पारदर्शक असावी यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचेही राणे यांनी ट्विटद्वारे नमूद केले आहे.
उच्च पदावर असलेल्या लोकांनी केलेल्या बेकायदा गोष्टींचा पर्दाङ्गाश केला जाणार असल्याचे सांगून त्यासंबंधीचे तपासकाम चालू असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. आपण ज्या लोकांना निवडून देतो ते लोक कसल्या वृत्तीचे आहेत हे जनतेने पहायला हवे असे सांगून काहीजण हाती सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा स्वत:च्या ङ्गायद्यासाठी वापर करून घेत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. काही लोकांना धमक्या देऊन त्यांना त्यांच्या जमिनी विकण्यास भाग पाडण्यात आले असल्याचे आढळून आले असल्याचीही माहिती यावेळी राणे यांनी दिली.