भू-सर्वेक्षण व नोंदणी खात्याच्या भू-नक्षामध्ये आपणाला हवे तसे बदल घडवून आणत 200 पेक्षा जास्त बांधकामांचा त्यात समावेश करण्यात आल्याच्या प्रश्नावरुन काल विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करीत हा एक मोठा घोटाळा असून, त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी यावेळी केली. केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी महसूल बाबूश मोन्सेरात यांनी त्यात कोणताही घोटाळा नसल्याचे सांगतानाच या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही यावेळी चौकशी करू, असे सभागृहात सांगितले.

