ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्ती वटहुकुमाच्या विरोधात २३ पासून जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन दोन दिवस चालेल या आंदोलनाला प्रसिद्ध समाजसेवक मेधा पाटकर तसेच देशभरातील शेतकरी संघटनांचा पाठिंबा लाभणार असल्याचे अण्णा हजारे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. हजारे २३ रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत. आपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाल्यानंतर हजारेंचे हे पहिले आंदोलन असेल. दरम्यान, आपचे ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांनी अण्णांच्या या आंदोलनात आप सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

