Home बातम्या भूमिकेच्या चाकोरीत अडकायचे नाही : सचिन खेडेकर

भूमिकेच्या चाकोरीत अडकायचे नाही : सचिन खेडेकर

0

केवळ पालकच मुलांवर नव्हेत तर मुलेही पालकांवर संस्कार करू शकतात हे ‘तार्‍यांचे बेट’ या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे या चित्रपटात नायकाची भूमिका केलेले श्री. खेडेकर यांनी पुढे सांगितले. दहा आठवडे हा चित्रपट चालल्याचे सचिन खेडेकर व दिग्दर्शक किरण यज्ञोपावित यांनी यावेळी सांगितले.

अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड व बालाजी फिल्म प्रॉडक्शन्ससारख्या हिंदीतील मोठ्या प्रॉडक्शन हाउसेसनी मराठी चित्रपट निर्मिती करण्यास सुरवात केल्याने मराठी चित्रपट उद्योगाला ऊर्जावस्था प्राप्त होण्यास त्याची मदत झाली आहे काय असे विचारले असता ‘निश्‍चितच’ असे उत्तर सचिन खेडेकर व किरण यज्ञोपावित यांनी यावेळी दिली. मार्केटिंगची जबरदस्त ताकद या प्रॉडक्शन्स हाउजजवळ असल्याने मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यास त्याची मदत होणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय या प्रॉडक्शन्स हाउसकडून चित्रपट निर्मितीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊ शकत असल्याने चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही चांगले होण्यास मदत होत असल्याचे ‘विहीर’, ‘तार्‍यांचे बेट’ वरून सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. ‘अग्निपथ’, ‘क्रिश-२’ हे आपले आगामी चित्रपट असल्याचे ते म्हणाले.