भूखंड वितरणात घोटाळाविरोधकांचा आरोप

0
13

गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वितरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काल विरोधकांनी विधानसभेत केला. यावेळी सकारवर टीका करताना आमदार विजय सरदेसाई यांनी उद्योग खात्याने याप्रकरणी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आयडीसीचे 52 कोटींचे नुकसान झाले असल्याचा आरोप केला. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सरदेसाई यांचे आरोप फेटाळून लावले. आयडीसीचे भूखंड वितरीत करण्यासाठी निकष ठरवण्यात आलेले असून त्यानुसार अर्जदारांना गुण देण्यात येत असतात. त्यामुळे हे भूखंड वितरीत करताना कोणताही घोटाळा करता येत नाही. तसेच उद्योग खाते एकटेच स्वतंत्रपणे ही प्रक्रिया पूर्ण करीत नसते, असे आपली बाजू मांडताना गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

मात्र, सरदेसाई यांनी याप्रकरणी समिती स्थापन करून त्यात आपणाला स्थान द्यावे. आपण घोटाळा उघड करतो व तसे न झाल्यास येती निवडणूक न लढवण्याचे आव्हान स्वीकारतो, असे सांगितले.