भिवंडी-मुंबईतील छाप्यात संशयित तिघांना अटक

0
14

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) छापेमारी करत भिवंडीतील विविध भागांतून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे 3 लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवल्याचा आरोप आहे. या तिघांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (22 वर्षे), रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी) अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (22 वर्षे), रा. गुलजार नगर, भिवंडी) जैद नोटियार अब्दुल कादिर (22 वर्षे), रा. वेताळ पाडा, भिवंडी, अशी अटक केलेल्या तरुणाची नावे आहेत. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखोंची रक्कम फिलिस्तीन देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर यूपी एटीएस एक पथक भिवंडीत दाखल होऊन तपास सरू केला असता दिवसभर या तरुणावर पळत ठेवून भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकाने छापेमारी करत अबू सुफियान तजम्मुल अन्सारी मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर यांना ताब्यात घेतले.