Home बातम्या भाषा सुरक्षा मंचाच्या निदर्शकांना अटकाव

भाषा सुरक्षा मंचाच्या निदर्शकांना अटकाव

0

शिक्षक दिनाच्या सरकारी सोहळ्यावेळी निदर्शने करण्यासाठी आलेले भाषा सुरक्षा मंचाचे कार्यकर्ते युगांक नाईक, प्रियंका प्रभू चोडणेकर आदींना काल पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकावर स्थानबध्द केले. कला अकादमीतील कार्यक्रम आटोपल्यावरच त्यांना जाऊ देण्यात आले. शिक्षक दिनाचा कार्यक्रम युवा शक्ती उधळील असा इशारा देणारे मंचाचे नेते विष्णू सूर्या वाघ मात्र कार्यक्रमस्थळी फिरकले नाहीत.