भारत तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर

0
25

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेंगळुरुत प्रतिपादन

>> ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्थेच्या विधानाला उत्तर

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांना उत्तर देताना भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपण 10 व्या क्रमांकावरून पहिल्या 5 व्या क्रमांकावर आलो आहोत. लवकरच पहिल्या 3 मध्ये येऊ. ही ताकद सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनातून आली आहे. देशाच्या कामगिरीचा झेंडा आकाशात उंच फडकत असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी काल रविवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. यावेळी मोदींनी बंगळुरूमधील केएसआर रेल्वे स्थानकावर 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये बंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे. यानंतर जनतेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत ट्रेनमधून प्रवास केला.

पंतप्रधानांनी बंगळुरू आणि राज्यासाठी अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणीदेखील केली. या प्रकल्पांचा एकूण खर्च 22 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पंतप्रधानांनी बंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचेही उद्घाटन केले. ही लाईन आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा पर्यंत जाईल.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 31 जुलै रोजी भारतावर 25% कर लादला होता आणि भारत व रशियाची अर्थव्यवस्था मृत असल्याचे म्हटले होते. भारत आणि रशियाला त्यांच्या अर्थव्यवस्थांसह बुडू द्या असेही विधान केले होते. या विधानाचा संदर्भ घेत पंतप्रधान मोदी यांनी, भारत ही लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, भारतीय सैनिकांची दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला गुडघे टेकण्याची क्षमता संपूर्ण जगाने पाहिली आहे. यामागे मेक इन इंडियाची शक्ती असून . बंगळुरूच्या तरुणांनीही यात मोठे योगदान दिले असल्याचे आवर्जून सांगितले.

भारताची उत्तरोत्तर प्रगती

पंतप्रधान मोदी यांनी, भारत देशाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. 2014 पूर्वी 74 विमानतळ होते आणि त्यांची संख्या 160 पेक्षा जास्त आहे. फक्त 3 राष्ट्रीय जलमार्ग होते, आता ही संख्या 30 झाली आहे. 11 वर्षांपूर्वी 7 एम्स होते, आता 22 एम्स आणि 700 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 2014 पूर्वी भारताची एकूण निर्यात 468 अब्ज डॉलर्स होती. आज ती 824 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले.

मोबाईल निर्यातदार देश

पूर्वी आपण मोबाईल फोन आयात करायचो पण आज आपण टॉप 5 निर्यातदारांपैकी एक झालो आहोत. यामध्ये बंगळुरूची खूप मोठी भूमिका आहे. 2014 पूर्वी आपली इलेक्ट्रॉनिक निर्यात 6 अब्ज डॉलर्स होती जी आता 38 अब्ज डॉलर्स झाली आहे. ऑटोमोबाईल निर्यात 16 अब्ज डॉलर्स होती जी आता दुप्पट झाली आहे. भारत सरकारने कायद्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी जन विश्वास विधेयक मंजूर केले आहे असे मोदी यांनी सांगितले.