भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच

0
29

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पहिली ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती. पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा सुमारे 3500 किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. यानंतर आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. गुजरात ते ईशान्य भारतातील मेघालयपर्यंत ही पदयात्रा काढली जाणार आहे, याबाबतची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत, असेही ते म्हणाले.