– भावना गोखले
मागील पाच वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाचे निरंतर अवमूल्यन झाले असून भारतीय चलन ४५ रुपयांवरून ६८ रुपयांपर्यंत खाली आले. विदेशी मानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मंदीला यापूर्वीच्या भारतीय पंतप्रधानांना जबाबदार धरले. एकूणच चर्चा ही पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था व्यवस्थित हाताळली नाही, या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर अनेक शंका मानांकन संस्थांच्या मानांकनाबाबत निर्माण झाल्या. सर्वसामान्यांना मानांकन संस्था काय, त्या कशा प्रकारचे मानांकन करतात, त्यांची कार्यप्रक्रिया या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले.
कर्ज मानांकन ही वित्तीय कर्ज पुरवठा करणार्या क्षमतेचे मूल्यमापन करणारी स्वतंत्र संस्था असून कर्जदार व्याज आणि मुद्दल रकमेवर परतङ्गेड कशी करू शकते, याचे परीक्षण करीत असते. मानांकन संस्था व्यापारी संस्थेकडून दर्जेदार आणि एकत्रित सांख्यिकी गोळा करून त्याचे विश्लेषण करते आणि ठराविक कालावधीतील पुरवण्यात आलेल्या कर्जाची परतङ्गेड करण्याची क्षमता आहे की नाही हे ठरविते.
मानांकन हे संकेतांकाद्वारे देण्यात येऊन गुंतवणूकदारांना यावरुन संस्थेची बाजारपेठेतील पत कळते. कर्ज मानांकनाद्वारे गुंतवणूकदारांना ङ्गक्त मार्गदर्शन मिळत असते. कुठल्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवावेत, गुंतवलेल्या योजनेतील संभाव्य मुदतीनंतर पुनर्गुंतवणूक करावी का, कर्ज जोखीम काय या संदर्भातील सल्ला देण्यास कर्ज मानांकन संस्था त्यांच्या मर्यादांमुळे असमर्थ आहेत. कर्जाचा प्रकार आणि अटी या संदर्भामधील संस्थेची क्षमता निर्देशित करण्यासाठी मानांकन चिन्हाचा उपयोग करण्यात येतो. कर्ज मानांकन हे कर्ज जोखमींसाठी मूल्यमापन करणारे असले तरी संपूर्ण जीवनाच्या सुरक्षिततेबद्दल एकदाच मूल्यमापन करणे व्यावहारिकदृष्टया योग्य नाही. जागतिक बाजारातील विविध बदलांच्या आधारावर सुरक्षिततेच्या दृष्टीने जोखमीकडे जागरुकतेने बघून वारंवार मानांकन करणे गरजेचे आहे
कर्ज मानांकनांचे कार्य
व्यावसायिक आणि स्वतंत्र संस्थेद्वारे केलेले मानांकन हे तीन संबंधित कर्ज जोखमींसाठी अधिक विश्वासू माहितीच्या आधारावर करण्यात येते. १) कर्ज मानांकन निःपक्ष मत देण्याचे काम करते. २) व्यावसायिक स्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर मानांकन संस्थेची जोखीम पडताळून पाहण्याची क्षमता असते. ३) अशी माहिती जी सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपलब्ध नाही ती या संस्थेकडून मिळते. या व्यतिरिक्त अखर्चिक माहिती उपलब्धतेचा स्रोत, व्यापार जोखीम परताव्याचा संभाव्य स्रोत, कॉर्पोरेट कर्जदारांना विश्वासक कर्ज स्रोत, संस्थेच्या गुंतवणूकीत सार्वजनिक धोरण मार्गदर्शिका बनवण्याचा स्रोत म्हणूनही कर्ज मानांकनाचे विशेष कार्य आहे.
कर्ज मानांकनाचे ङ्गायदे ः-
माहिती गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे विश्लेषण करणे हे कर्ज मानांकन संस्थेचे कार्य असून अनेक गुंतवणूकदार यावर विश्वास ठेवू शकतात. त्वरित गुंतवणूक निर्णय, वैयक्तिक गुंतवणुकीचे निर्णय, गुंतवणूकदारांचे संरक्षण हे कर्ज मानांकनाचे इतर ङ्गायदे आहेत. कर्ज मानांकन संस्था ही अशी संस्था आहे, जी व्यापारी संस्थांना कर्ज मानांकन पुरवित असून या व्यापारी संस्थांचे कर्ज घेण्याची क्षमता ठरवून देत असते. शहरे, गैर लाभ घेणार्या संघटना, सरकार, प्रतिभूती जे दुय्यम बाजार करतात, अशा सर्वांचा समावेश व्यापारी संस्थांमध्ये होतो.
कर्ज मानांकन संस्था व्यापारी संस्थांची कर्ज देण्याची क्षमता, कर्ज परतावा क्षमता आणि गुंतवणूकदारांची सुरक्षितता तसेच कर्जावरील व्याज ठरवून देत असते. कमी मानांकन सुरक्षितता ही उच्च व्याजदर ठरवून खरेदीदारांना आकर्षित करण्याचे काम जास्त जोखीम गुंतवणूकद्वारे करत असते. नगरपरिषदांचे बॉण्डस हे कमी व्याजदाराचे असतात, कारण त्यांच्यामध्ये कमी जोखीम असते. हे कमी जोखमीचे बॉण्ड असंख्य गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असतात. जेव्हा की अधिक जोखीम बॉण्ड हे वैशिष्टयपूर्ण गुंतवणूकदारांसाठी असतात. या व्यतिरिक्त मानांकन हे व्यापारी संस्थेची स्पर्धात्मक बाजारपेठेतील पत ठरविण्यास उपयोगी ठरते.
क्रेडिट ब्यूरो ः-
बँक, तारण कर्जदार, क्रेडिट कार्ड कंपनी आणि वित्तीय संस्था या कर्जपुरवठा करणार्या संस्था असून या संस्था अशा मानांकन संस्थांकडून माहिती गोळा करणे, वैयक्तीक तसेच संस्थांना कर्ज देण्यास संस्थांची माहिती एकत्रित करून नफ्यासाठी शुल्क आकारून परीक्षण करण्याचे काम करतात. ग्राहय माहितीच्या आधारावर केलेल्या परीक्षणामुळे गुंतवणूकदार/ग्राहकांना त्यांच्या कर्जाची क्षमता कळते. यामुळे कर्ज मानांकन संस्थांचे महत्त्व २१ व्या शतकात वाढले आहे.
कर्ज देणार्या संस्था वैयक्तिक तसेच सार्वजनिक संस्थांचे लेखे त्यांचे वित्तीय व्यवहार, बँकांचे लेखे तपासतात. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कर्ज मानांकन संस्थांकडे मानांकनाचे काम दिले असल्यास तुमचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणे जरुरीचे आहे. निवासी पत्ता, लेखाक्रमांक, बँक खाते हे अद्ययावत असणे आवश्यक आहे. अनेक कर्जदार आर्थिक ङ्गसवेगिरीवर नियंत्रण म्हणून इलेक्ट्रोरल रजिस्ट्रेशनचा उपयोग करण्यात येतो. त्या संदर्भातील माहिती ही अद्ययावत राखणे आवश्यक आहे. कर्ज मानांकन संस्था, अतिरिक्त प्रमाणपत्र स्रोत, गुंतवणूकदारांच्या संख्येतील वाढ आणि जोखीम पडताळत असतात. तसेच वित्तीय प्रणाली, व्यापारी बँका आणि विदेशी संस्थांची गुंतवणूकबाबतची कार्य सुकर करतात.
कर्ज मानांकनांची नवीन चिन्हे ः-
कर्ज मानांकनामध्ये एकात्मता आणि सहज प्रमाणके मिळवण्याच्या दृष्टीने तसेच गुंतवणूकदारांना कर्ज मानांकन समजून यावे यासाठी सेबीने काही कर्ज मानांकनाची चिन्हे ठरवून दिली आहेत. जी दीर्घ मुदती आणि लघु मुदती वित्तीय अवजारांसाठी उपयुक्त ठरतील. जसे की कर्ज, म्युच्युअल ङ्गंड, वित्तीय प्रारुप इ. दीर्घ मुदतीसाठी मानांकन.
भारतीय मानांकन संस्था उद्योगाने स्वतःचा पाया बर्याच वर्षांपासून मजबूत केला असून भारतीय मानांकन संस्थांमध्ये प्रामुख्याने क्रायसील (सीआरआयएसआयएल), केअर (सीएआरई), ओएनआयसीआरए, एङ्गआयटीसीएच आणि सेमिरा (एसएमईआरए) या संस्थांचा समावेश आहे. क्रायसील ही सर्वात मोठी भारतातील मानांकन करणारी संस्था असून जवळपास ६० टक्के सेवा बाजारपेठ या संस्थेने काबीज केली आहे. निर्मिती, सेवा, वित्त आणि लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी ही संस्था मानांकनाचे काम करते. तर एसएमईआरए ही ङ्गक्त लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांच्या मानांकनासाठी स्थापन करण्यात आली. १९९३ मध्ये स्थापन झालेली कर्ज विश्लेषण आणि संशोधन मर्या. (सीएआरई) ही विविध बँकांच्या संशोधन आणि सल्ला समितीसाठी मानांकनाचे काम करते. तर ओएनआयसीआरए ही ग्राहकसंबंध, वित्त, लेखा, व्यवस्थापनाच्या मानांकनाचे काम करते.
भारतीय मानांकन संस्थांचे भविष्यः-
असा अनुभव आहे की, भारतातील मानांकन संस्थांनी केलेल्या मानांकनाच्या ३० टक्के मानांकन स्वीकृत करण्यात आले. या अत्यंत निम्न दर्जाच्या मानांकनामुळे अशा संस्था इतर मानांकन संस्थांकडे वळल्या यामुळे कर्ज मानांकन संस्थांच्या सेवांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. आतापर्यंत कमर्शियल पेपर्स, बॉण्डस, कर्ज रोखे आणि गैर बँकिंग संस्थांचे मोठया प्रमाणावरील मुदती ठेवी, ज्या रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्वांसाठी मानांकन करणे गरजेचे केल्याने मानांकनाचा दर्जा वाढविणे क्रमप्राप्त झाले. मानांकन संस्थांची अशी अपेक्षा आहे की, कर्ज सुरक्षितता आणि प्रतिभूती यांना आकार देण्याचे काम वित्तीय संस्थांकडून केले जावे जेणेकरून गुंतवणूकदारांच्या अशा एक वेगळया वर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील. यामुळे कर्जमानांकन संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे.

