इराणला एकाकी पाडण्याचा आणि त्यावर आर्थिक दडपण वाढवण्याच्या उद्देशाने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चाबहार बंदराच्या विकासकामांवर आणि इतर व्यावसायिक क्रियांवर असलेली निर्बंधांची सूट रद्द करण्याची घोषणा केली आहे. सध्या इराणमध्ये असलेल्या, पण भारताच्या मदतीने तयार होणाऱ्या चाबहार बंदराला 2018 च्या एका तरतुदीअंतर्गत निर्बंधातून सूट दिली गेली होती. ही सूट 29 सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे. अमेरिकेने 2018 मध्ये निर्बंधातून सूट दिली होती. त्यामुळे भारताला इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्याची परवानगी मिळाली होती. चाबहार बंदराचा मोठा भाग भारताच्या आर्थिक मदतीने विकसित केला जात आहे.

