भारतात ॲपलचा विस्तार करणार : कुक

0
11

भारत दौऱ्यावर असणारे ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. आपल्या भारत दौऱ्यात स्वागताने भारावून गेलेल्या टिम कुक यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. टीम कूक यांनी भारतात ॲपलचा विस्तार करणार असून, गुंतवणुकीवरही भर देणार असल्याचे म्हटले. भारतात होत असलेल्या तंत्रज्ञान बदलाबाबत चर्चा करून आनंद वाटला असल्याचे त्यांनी सांगितले.

टिम कुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतची माहिती ट्विट करून दिली. टिम कुक यांनी म्हटले की, शिक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन आणि पर्यावरण आदी मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. देशभरात व्यवसाय विस्तारासह गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टिम कुक यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती ट्विटरवरून दिली. टिम कुक यांच्यासोबत भेटून विविध मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे मोदी यांनी सांगितले.