31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

भारताचा विंडीजवर मालिका विजय

>> तिसरा एकदिवसीय सामना ६ गड्यांनी जिंकला

>> विराट कोहलीने ठोकले ४३वे वनडे शतक

कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर तिसर्‍या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विंडीजवर ६ गडी राखून विजय मिळवला. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. २००७ सालापासून विंडीज व भारत यांच्यातील द्विपक्षीय संघातील सलग नववी मालिका जिंकण्याच्या पराक्रम भारताने केला.

वेस्ट इंडीजच्या २२ षटकांत २ बाद १५८ धावा झालेल्या असताना पावसामुळे खूप वेळ वाया गेला. त्यामुळे १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला. पहिल्या ६५ चेंडूंत ११५ धावा कुटलेल्या विंडीजला उर्वरित १४५ चेंडूंत केवळ १२५ धावा करता आल्या त्यामुळे २६०च्या पार जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

विंडीजला २४० धावांत रोखल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी २५५ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. शिखर धवनसोबतच्या समन्वयाच्या अभावामुळे रोहित शर्मा धावबाद झाला. विराट कोहलीने यानंतर शिखरला सोबत घेऊन दुसर्‍या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी रचली. डावातील तेराव्या षटकात शिखर परतल्यानंतर याच षटकात ऋषभ पंत (०) बेजबाबदार फटका खेळून माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने विराटच्या साथीने शतकी (१२०) भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयस अय्यर ६५ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार विराट कोहलीने केदार जाधवच्या साथीने आपल्या ४३ व्या शतकाची नोंद केली आणि सामन्यात विजय मिळवला.

धावफलक
वेस्ट इंडीज ः ख्रिस गेल झे. कोहली गो. खलील ७२, एविन लुईस झे. धवन गो. चहल ४३, शेय होप त्रि. गो. जडेजा २४, शिमरॉन हेटमायर त्रि. गो. शमी २५, निकोलस पूरन झे. पांडे गो. शमी ३०, जेसन होल्डर झे. कोहली गो. खलील १४, कार्लोस ब्रेथवेट झे. पंत गो. खलील १६, फॅबियन एलन नाबाद ६, किमो पॉल नाबाद ०, अवांतर १०, एकूण ३५ षटकांत ७ बाद २४०
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ५-१-४८-०, मोहम्मद शमी ७-१-५०-२, खलील अहमद ७-०-६८-३, युजवेंद्र चहल ७-०-३२-१, केदार जाधव ४-०-१३-०, रवींद्र जडेजा ५-०-२६-१
भारत ः (लक्ष्य ३५ षटकांत २५५) ः रोहित शर्मा धावबाद १०, शिखर धवन झे. पॉल गो. एलन ३६, विराट कोहली नाबाद ११४ (९९ चेंडू, १४ चौकार), ऋषभ पंत झे. पॉल गो. एलन ०, श्रेयस अय्यर झे. होल्डर गो. रोच ६५ (४१ चेंडू, ३ चौकार, ५ षटकार), केदार जाधव नाबाद १९, अवांतर १२, एकूण ३२.३ षटकांत ४ बाद २५६
गोलंदाजी ः किमार रोच ७-०-५३-१, जेसन होल्डर ४-०-३९-०, किमो पॉल ५-०-३९-०, फॅबियन एलन ६-०-४०-२, रॉस्टन चेज ७-०-४३-०, कार्लोस ब्रेथवेट ३.३-०-३८-०

विराट विक्रमवीर
विराटने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६८वे, वनडे क्रिकेटमधील ४३वे, धावांचा पाठलाग करताना २६वे, कर्णधार या नात्याने २१वे व विंडीजविरुद्धचे नववे एकदिवसीय शतक ठोकले. कॅरेबियन भूमीवर सलग तीन शतके ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला. २०१७ साली किंग्सटन येथे नाबाद १११ धावांची खेळी केल्यानंतर त्याने काल संपलेल्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात १२० व तिसर्‍या लढतीत १११ धावांची खेळी करत नवीन विक्रम केला. एखाद्या संघाविरुद्ध सर्वांत कमी ३५ डावांत ९ शतके लगावणार्‍यांच्या यादीत कोहली अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने सचिन तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया (७० डावांत ९ शतके) याला मागे टाकले. ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी आठ शतके ठोकून दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावरदेखील कोहलीच आहे. कर्णधार या नात्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा काल कोहलीने ओलांडला. कोहलीला यासाठी १७६ डाव लागले. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगला यासाठी २२५ डाव लागले होते. शतकी वाटचाली दरम्यान ८६वी धाव घेताच कोहलीने यंदाच्या कॅलेंडर वर्षांत सर्वाधित धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (१२३२) याला मागे टाकले. कोहलीच्या नावे आता १२६० धावा झाल्या आहे.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

‘आयसीएसई’ बोर्डाची १०/१२वीच्या परीक्षा पुढे

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आयसीएसई बोर्डाकडून दहावी व बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकताच केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी...

चेन्नईने किंग्ज पंजाबला लोळवले

>> दीपक चहरची भेदक गोलंदाजी >> मोईन अलीही चमकला दु्रतगती गोलंदाज दीपक चहरच्या भेदक मार्‍याच्या जोरावर...

मुंबई इंडियन्स-सनरायझर्स हैदराबाद लढत आज रंगणार

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएलच्या १४व्या पर्वातील नववी लढत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज रंगणार आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध ः मुख्यमंत्री

>> मडगावचे ईएसआय इस्पितळ आजपासून पुन्हा सुरू >> शुक्रवारी कोरोनाने ९२७ बाधित, सहाजणांचा मृत्यू राज्यातील कोरोना...