भारताचा ऑगस्टमध्ये आफ्रिका दौरा शक्य

0
148

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑगस्ट महिन्यात तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट मंडळ व क्रिकेट साऊथ आफ्रिका यांनी ही मालिका खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास या दौर्‍यासाठी बीसीसीआयला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागू शकते.

आयसीसीच्या भविष्यातील वेळापत्रकामध्ये (फ्युचर टूर प्रोग्राम) या मालिकेचा समावेश नाही. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर आला होता. यावेळी द. आफ्रिका क्रिकेट मंडळाने भारतीय संघाला आपल्या देशात येऊन मालिका खेळण्याचे निमंत्रण दिले होते. भारताने हा प्रस्ताव तत्वतः मान्यही केला होता. आता
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक ग्रीम स्मिथ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने यांनी ही मालिका खेळवण्याबद्दल काल टेलिकॉन्फरन्सद्वारे अंतिम निर्णय घेतला. याआधी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर आला होता. मात्र पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित सामनेही कोरोना विषाणूंच्या पार्स्वभूमीवर रद्द करण्यात आले होते. तेव्हापासून भारतीय संघ अजून एकही सामना खेळलेला नाही.