प्रशासकीय अहवालातील माहिती
* नारळ योजनेचा ९९० जणांना लाभ
* सुपारी योजनेचे २९५० लाभार्थी
* नारळ योजनेवर २ कोटी ९४ लाख
कृषी खात्याच्या भातासाठी असलेल्या आधारभूत योजनेचा ५५०१ शेतकर्यांना २०१०-११ या आर्थिक वर्षात लाभ मिळाल्याची माहिती वार्षिक प्रशासकीय अहवालात देण्यात आली अहे. या योजनेवर ३ कोटी १६ लाख रुपये खर्च केले आहे. चालू २०१२-१३ वर्षात भातावरील आधारभूत दर प्रति किलोमागे १७ रुपये देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भात शेतीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रती नारळावरील आधारभूत दर योजनेचा लाभ राज्यातील ९९० बागायतदारांनी घेतला असून या योजनेवर सरकारने १ कोटी ९४ लाख रुपये खर्च केले आहेत.
नारळावरील आधारभूत दरातही वाढ करण्याची बागायतदारांची मागणी आहे. सुपारीसाठीच्या आधारभूतदराचा लाभ २९५० शेतकर्यांना झाला असून त्यासाठी कृषी खात्याने २ कोटी ६६ लाख रुपये खर्च केल्याचे वरील अहवालात स्पष्ट केले आहे. वरील काळात राज्यात ४६ हजार ६१२ हेक्टर जमीन भात शेतीच्या उत्पादनाखाली आणली आहे.