काल बाजारपेठांसाठी काही वाहने माल घेऊन गोव्यात येत असताना परवा रात्री खानापूर व चोर्ले घाट या भागात हद्दीवर वाहने अडविण्याचा व टायरातील हवा निकामी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. परवा मध्यरात्री शेजारच्या राज्यातील काही घाऊक विक्रेत्यांनीच पुढाकार घेऊन मध्यस्थी केल्याने वाहने सोडण्यात आली.
यापुढेही वाहने अडविण्याचा इशारा दिला त्यामुळे माल वाहतूक करणार्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गोवा सरकारने लागू केलेला प्रवेश कर रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे.
भाजी पुरवठ्याच्या बाबतीत सध्या राज्यात अनिश्चित वातावरण निर्माण झाल्याने त्याचा भाजीच्या दरावर बराच परिणाम झाला आहे. काल पणजी बाजारपेठेत गाजर रु. ६०, वालपापडी रु. १००, ओली कोथिंबीर २० ते ३० रु. जुडी, गवार ४० रु. व फ्लॉवर ५० रु. प्रती किलो असा दर होता.
येत्या दोन दिवसात वरील प्रश्नावर कायमचा तोडगा न निघाल्यास व्यापार्यावर त्याचा परिणाम होईल, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे. भाजीवरच नव्हे तर अन्य सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत गोवा शेजारच्या राज्यांवर अवलंबून असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.