भाजप राष्ट्रीय बैठकीत नरेंद्र मोदींचा प्रभाव

0
52

भाजपच्या येथे आयोजित राष्ट्रीय बैठकीचा प्रकाशझोत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरच राहिला. गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सलग तिसर्‍यांदा विजयी झाल्याबद्दल भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी त्यांचा यावेळी गौरव केला.

भाजपमधील अनेकांनी मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. या बैठकीत मोदींचे नाव आल्यानंतर प्रत्येक वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याने मोदींचा बैठकीवरील प्रभाव स्पष्ट झाला.