भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीत घेतली बी. एल. संतोष यांची भेट

0
17

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नवी दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
बी. एल. संतोष यांच्याशी प्रदेश भाजपचे संघटनात्मक कार्य, आगामी संघटन कार्यशाळा व इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती दामू नाईक यांनी या भेटीनंतर दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल लांबणीवर टाकण्यात आला होता. आता, गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पूर्ण झाल्याने राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे. राज्य मंत्रिमंडळातून गोविंद गावडे यांना डच्चू देण्यात आल्याने एक जागा रिक्त झालेली आहे. तसेच, आणखी काही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.