भाजप अध्यक्षपदी राजनाथ सिंह

0
57

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांची एकमताने निवड झाली. गतअध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा सुधारणे व अंतर्गत वाद मिटवणे अशी तातडीची आव्हाने सिंह यांच्यासमोर असतील. ६१ वर्षीय राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत.

२००९मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून त्यांनी निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. ते गाझियाबादहून लोकसभेचे खासदार आहेत. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले की, नव्या पक्षाध्यक्षांसमोर सर्वात मोठी जबाबदारी कुठल्याही परिस्थितीत अनैतिक प्रकारांना थारा न देणे ही आहे.