भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुका २३ जानेवारी रोजी होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा व दुसर्या सर्वमान्य उमेदवाराचा अभाव यामुळे नितीन गडकरीच दुसर्या कार्यकाळासाठी पक्षाध्यक्षपदी निवडले जाण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही अखेर गडकरींना पाठिंबा दिल्याचे सूत्रांकडून समजते. सुषमा स्वराज व नरेंद्र मोदी यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

