भाजपाविरुध्द ‘आप’ची तक्रार

0
67
भारतीय जनता पक्षाने दि. १० एप्रिलपर्यंत मडगांव येथील लोहिया मैदान आरक्षित केले आहे. त्यामुळे तेथे अन्य कोणालाही सभा घेणे शक्य होणार नसल्याचे या प्रकरणी निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार केल्याचे आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी काल पत्रकारपरिषदेत सांगितले.

मनिष सिसोदियांची आज पणजीत सभा

आज संध्याकाळी ५.३० वाजता पक्षाचे राष्ट्रीय नेते मनीष सिसोदिया यांची येथील आझाद मैदानावर जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.