भाजपच्या उमेदवारांची घोषणा दोन-तीन दिवसांत ः मुख्यमंत्री

0
11

>> ३७ मतदारसंघांतील नावे निश्‍चित

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून येत्या १६ जानेवारीपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

भाजपच्या गाभा समिती आणि निवडणूक समितीची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३७ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी माहिती या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत सुमारे ३७ मतदारसंघांतील नावे निश्‍चित करण्यात आली असून इतर मतदारसंघांतील नावे निश्‍चित करून १४ जानेवारीपर्यंत उमेदवारांची नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली जाणार आहेत, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.