भाजपच्या उमेदवारांची आज होणार घोषणा

0
3

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार निवडीसाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे काल घेण्यात आली. त्यामुळे गुरुवारी भाजपच्या उमेदवारांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप गोवा प्रभारी सी. टी. रवी, देवेंद्र फडणवीस, सदानंद शेट तानावडे, श्रीपाद नाईक, सतीश धोंड आदी उपस्थित होते.