दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळकर यांनी शनिवार दि. २४ रोजी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरविले आहे.परंपरेप्रमाणे श्रीमहालक्ष्मी मंदिरात प्रार्थना करून आपण अर्ज दाखल करणार असल्याचे श्री. कुंकळकर यांनी सांगितले. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास आपण या पूर्वीच सुरूवात केली असून पणजीतील मतदारांनी सक्रिय पाठिंबा व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला. निवडणुकीनंतर आपल्याला या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी दोन वर्षांचा कार्य काळ मिळेल. या काळात आपण राजधानी व आजुबाजूच्या परिसरातील कचर्याच्या प्रश्नाला अधिक प्राधान्य देऊन नागरिकांचे जीवन सुखद करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे कुंकळकर यांनी सांगितले. पणजी मतदारसंघात सुमारे २२ हजार मतदार आहेत. सदस्य नोंदणी महिमेस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

