29 C
Panjim
Saturday, October 24, 2020

भाजपची प्राथमिक सदस्य नोंदणी नि:शुल्क

>> ऑनलाईन सुविधा उपलब्ध

>> सरचिटणीस सदानंद तानावडे यांची माहिती

भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड नोव्हेंबरअखेरपर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य सदस्य नोंदणी प्रमुख तथा सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला येत्या ६ जुलैपासून सुरुवात केली जाणार आहे. ६ ते १४ जुलै या काळात सदस्य नोंदणीसाठी पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यात ४ लाख भाजप सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सदस्य नोंदणीसाठी भाजप कार्यालय किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची गरज नाही. भाजपने पाच वर्षापूर्वी ४ लाख १९ हजार सदस्यांची नोंदणी केली होती, असेही तानावडे यांनी सांगितले.

सदस्य नोंदणीच्या प्राथमिक कामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २७ जून ते ४ जुलै दरम्यान चाळीस मतदारसंघांमध्ये खास कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणीवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्य कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची ९० टक्के उपस्थिती होती, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजप कमकुवत असलेल्या काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर सदस्य नोंदणीवर जास्त भर देण्याचे ठरविण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील साखळी मतदारसंघात १५ हजार सदस्य नोंदणी, तर दक्षिण गोव्यात बाणावली मतदारसंघात २ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रत्येक मतदान केंद्रावर मते मिळालेली आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्र समिती, मतदारसंघ समिती, जिल्हा समित्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राज्य समितीची निवड केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उत्तर गोवा सदस्य नोंदणी प्रमुख तथा माजी मंत्री दिलीप परूळेकर आणि दक्षिण गोवा सदस्य नोंदणी प्रमुख सर्वानंद भगत यांची उपस्थिती होती.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मनिर्भर भारत

प्रदीप गोविंद मसुरकर(मुख्याध्यापक) प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते,...

रंग पत्रांचे…

सौ. प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव-वाळपई) पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी...

थोडं मुक्त.. थोडं बद्ध..

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर(फोंडा) स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. जुन्या चालीरीती झुगारून देऊ...

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

ALSO IN THIS SECTION

प्लाझ्मा उपचार पद्धती चालूच ठेवणार

>> आरोग्यमंत्र्यांची माहिती, २६३ जणांवर प्लाझ्मा थेरपी गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा बराच फायदा होत...

गृहआधार योजनेसाठी दरवर्षी उत्पन्न, हयात दाखल्याची सक्ती

>> महिला, बाल कल्याण खात्याचा निर्णय महिला आणि बाल कल्याण खात्याने गृहआधार योजनेच्या लाभार्थींंना दरवर्षी उत्पन्न आणि हयात दाखला...

मध्यप्रदेशातील कोळसा खाणीसाठी सल्लागार कंपनीची निवड ः मुख्यमंत्री

>> पीपीपी सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पीपीपी सुकाणू समितीच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत...

लुटणार्‍यांना पुन्हा संधी नको ः मोदी

>> बिहारमध्ये पंतप्रधानांच्या तीन प्रचार सभा बिहारला लुटणार्‍या लोकांना पुन्हा राज्यात संधी देऊ नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश

भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसे यांनी काल शुक्रवारी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत रीतसर प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील...