25 C
Panjim
Saturday, October 24, 2020

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी लावल्याने ती बरी होते. असे करू नये. यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते व जखम लवकर भरून येत नाही. यापेक्षा वॅसलीन जेली किंवा ऍलो वेरा जेल हे असेल तर लावणे परवडेल.

अपघाताच्या व्यतिरिक्त जळणे/भाजणे हे घातपातामुळेदेखील होऊ शकते जसे की यौनशोषण, वैयक्तिक वाद, जोडीदाराशी- मोठ्यांशी गैरवर्तन, व्यवसायातील विवाद इ. सिगारेटने मुखाला- हातापायाना दिलेले चटके, आत्मदहन करणे (घरगुती हिंसा/कलह, हुंडा यामुळे), ऍसिड ऍटॅक ही सर्व याचीच उदाहरणे.
कित्येकवेळा आपला निष्काळजीपणादेखील तेवढाच कारणीभुत ठरत असतो. विशेषतः किचनमध्ये काम करत असताना. जसे की गॅस कनेक्शन नीट न लावणे ज्यामुळे गॅसची गळती होऊन स्फोट होऊ शकतो व सगळंच राख होईल. जर तेथे माणसांचा वावर असेल तर भाजणे, जीवितहानी होणे हे तर नक्कीच आहे. काही जणांना वाईट सवय असते की गॅस गळती तपासायला माचिसची काडी पेटवून ती गॅससिलेंडरच्या जवळ घेऊन जातात. त्यांचा असा समज असतो की गॅस गळती जेथे आहे तेथे ती ज्वाला प्रज्वलित होईल. पण हे साफ चुकीचे आहे. उलट ज्वाला अजूनच भडकेल. कृपया असे करणे टाळावे. गॅसगळतीचा वास किंवा जरा देखील संशय आला तर सर्वांत अगोदर दरवाजा, खिडक्या उघड्या करून तो वास बाहेर जाऊ द्यावा. कुठल्याही विजेच्या उपकरणाला (लाइट स्विच इ.) हात लावू नये. ते चालू करायला जाऊ नये. ओल्या हातांनी तर नाहीच नाही (हे इतर वेळेसही लागू होते). योग्य दक्षता घेऊन माहितगार माणसानेच ते कनेक्शन नीट करावे. बाहेर जाताना, झोपताना गॅस कनेक्शन बंद करावे.
ज्या गोष्टींपासून शरीराला इजा होऊ शकते त्या व्यवस्थित व काळजीपूर्वक हाताळणे. सर्वांत जास्त काळजी कुकर उघडत असताना घ्यावी. बहुतेक वेळा त्याची वाफ ही तोंडावर आल्याने तोंड भाजू शकते. तसेच तेलात एखादा जिन्नस तळत असताना त्यामध्ये थेट पाण्याचा संपर्क आल्यास ते उसळून अंगावर पडू शकते. पूर्ण कपडे अंगावर (संरक्षणाचे) घालूनच येथे काम करणे अपेक्षित आहे. गीझरचे गरम पाणी अगोदर भांड्यामध्ये काढ़ून नंतरच आंघोळ करावी. ते थेट अंगावर, डोक्यावर घेऊ नये.
केसांचे स्थ्रेटनिंग (सरळ) करत असतानासुद्धा केस जळण्याचा धोका असतोच. चुकीच्या व डुप्लिकेट उत्पादनाने ही शक्यता जास्त असते. विद्युत उपकरणे वापरताना लाकडाच्या खुर्चीवर बसून वापरलेले बरे किंवा पादत्राण (चप्पल) घातल्याने जमिनीशी थेट संपर्क येत नाही व विद्युतप्रवाहाची तीव्रता कमी होते.
गाडी बिघडली असताना चालू किंवा गरम इंजिनाला हाताळणे टाळावे. तसेच तेथील कूलंट, पाणी असलेले कम्पार्टमेंट (कप्पे) बॅटरी यांनाही हात लावू नये. गाडी खूप वेळ उन्हात जर असेल तर त्यात लगेच बसू नये. अगोदर गाडीच्या काचा/ खिडक्या, दरवाजे उघडे करावेत व आतल्या गरम वाफा बाहेर जाऊ द्याव्यात.
सण, उत्सव, समारंभाच्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करणे हे तर एकप्रकारचे फॅडच झाले आहे. आपण किती प्रमाणात ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषण करतो याचे भान आपल्याला नसते आणि हे फटाके जर हातात, अंगावर फुटले तर? त्यांची किटाळे जर शरीरावर पडली तर? वर्षाकाठी कित्येक लाखो लोकांचा मृत्यू यामुळेच होत असतो. फटाके तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये कितीतरी अपघात होत असतात. आत्तापर्यंत झालेल्या विश्वयुद्धातील बॉम्बहल्ल्यात कोट्यवधी लोकांना याची झळ बसली आहे व पुढे होतीलही. काहीना त्याचे परिणाम अजूनही भोगावे लागत आहे. पुढील पिढीला त्रास झाला.
पॉलिएस्टर, नायलॉन, लिनन, सिल्क कपड्यांना लगेच आग लागते व आगीने पेट घेतल्यास हे कपडे अंगास वितळतात व चिकटतात आणि परिस्थिती अजूनच बिकट बनते. आगीशी संपर्क होत असल्यास त्यातल्या त्यात वूलचे कपडे शक्यतो वापरावे. आपल्या देशात एक सवय आहे की पूजापाठ करत असताना बायका सिल्कच्या साड्या घालून केस सोडून घरातली कामं करतात व येथेच चुकते. येथे जर साडीच्या पदर/पदराने आगीचा पेट घेतल्यास आटोक्यात आणणे खूप कठीण जाते.
लोक ज्या पद्धतीने आत्मदहन करून स्वतःला संपवण्याच्या किंवा ऍसिड ऍटॅकसारख्या गोष्टी करतात त्यांनी हेही लक्षात ठेवावे की जर ती व्यक्ती जिवंत राहिल्यास याचे दुष्परिणाम त्या व्यक्तिच्या शरीरासोबत मनावरही होतात व यातना भयानक असतात. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीशी संबंधित इतरांनादेखील त्रास होतात. म्हणूनच जिवावर बेतेल अशा कुठल्याही गोष्टींशी (आग, ज्वाला, विद्युत, गॅस, रासायनिक द्रव्य सारख्या) खेळू नये.
आधुनिक शास्त्रानुसार भाजणे/जळणे यामुळे झालेल्या जखमेचे वर्गीकरण ग्रेडनुसार केले जाते (म्हणजेच किती टक्के भाग भाजला आहे किंवा किती खोलपर्यंत ती जखम झालेली आहे- ग्रेड १,२,३ व ४). रूल ऑफ नाइन/९ चा नियम हा देखील उपयोगी पडतो (यात शरीराच्या ९ भागांना प्रत्येकी ९% टक्के दिले आहेत व गुप्तांगाला १% असे एकूण १००% मध्ये भाजणे/जळणे हे मोजले जाते).
शरीराचा एखादा भाग जळाल्यानंतर खूप काळजीपूर्वक त्याची चिकित्सा करावी लागते.
१) सर्वांत अगोदर नळाच्या वाहत्या पाण्याखाली तो भाग धरावा/पकडावा. ते बर्फाळ पाणी नसावे किंवा जखमेला बर्फसुद्धा लावू नये. अशाने त्वचेला अजूनच मार बसेल.
२) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी लावल्याने ती बरी होते. असे करू नये. यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते व जखम लवकर भरून येत नाही. जखम ही अशीही बरी होऊ शकते काही दिवसानंतर. योग्य उपचार घेतले गेले तर त्यापूर्वीच ती बरी होते. यापेक्षा वॅसलीन जेली किंवा ऍलो वेरा जेल हे असेल तर लावणे परवडेल (जखम सुकू नये यासाठी).
३) त्वचेवर फोड आल्यास ते फोडू नयेत. त्यातील पाणी इत्यादी द्रव्य हे त्वचेच्या संरक्षणासाठी (त्वचेला अजून पुढे मार बसू नये म्हणून) तयार झालेले असते व ते बाहेर काढून टाकणे चुकीचे आहे.
४) त्वचेवर घट्ट मलमपट्टी करू नये. कापूस लावू नये. जखमेमध्ये अडकलेला कपडा, दागिना इ. स्वतः काढायला जाऊ नये. जखमेच्या बाजूला असतील तर ते दूर करावेत. लूब्रिकेंट जेली लावून त्यावर अलगद मलमपट्टी करावी (बाहेरील इन्फेक्शन, जंतू लागू नये म्हणून) किंवा स्वच्छ टॉवेल/रुमाल ठेवून त्वरित वैद्यांना दाखवावे. वैद्यांना दाखवेपर्यंत हे प्रथमोपचार सोडून काहीही घरगुती उपचार स्वतः करायला जाऊ नये. अंतर्गत औषधांव्यतिरिक्त सलाईन, रक्त चढवणे, प्लॅस्टिक सर्जरी अशा कित्येक उपचारांची (सोबत परीक्षणांची) गरज भासू शकते. रुग्णाला अतिदक्षता विभागात स्थलांतर केले जाऊ शकते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

घ्या काळजी आपल्या ‘स्वरयंत्रा’ची

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय) सर्वांत प्राथमिक लक्षण जे बहुतांश सर्वच स्वरयंत्राच्या संबंधित आजारांमध्ये असते ते...

नवरात्रात काय काळजी घ्याल?

डॉ. मनाली हे. पवारसांतईनेज, पणजी प्रत्येकाने स्वतः स्वतःला नियम घालून घ्यावेत. स्वतःसाठी, स्वतःच्या घरासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, सर्वांच्या हितासाठी...

ॐकार साधनेचे महत्त्व

योगसाधना - ४७७अंतरंग योग - ६२ डॉ. सीताकांत घाणेकर योगसाधनेत देखील ‘ॐ ’ शब्दाला फारच...

सुवर्णप्राशन आणि मुलांचे आरोग्य

वैद्य स्वाती अणवेकर(म्हापसा) सुवर्णप्राशनाच्या नियमित सेवनाने मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होते. तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे...

ओळख गाईच्या गोमयाची

वैद्य स्वाती हे. अणवेकर(आरोग्य आयुर्वेदिक क्लिनिकम्हापसा) शेणाचा वापर हा औषध निर्मितीमध्ये होतो. पंचगव्य ज्यात शेण, गोमूत्र, दूध, तूप,...