करमळी येथील घटना
करमळी येथे दोघा अज्ञात इसमांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सोमनाथ काणकोणकर याच्या पोटावर त्या दोघा अज्ञातांपैकी एकाने मूठ मारल्याने जखमी होऊन चार दिवसांच्या उपचारांनंतर त्याचे निधन झाल्याचे जुने गोवे पोलिसांनी सांगितले. गेल्या १२ रोजी सोमनाथ काणकोणकर हा दोघा अज्ञातांचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता.
त्यावेळी त्याच्या पोटावर भांडणार्यांपैकी एकाने जोरात मूठ मारली होती. त्यामुळे त्याच्या पोटात दुखायला लागल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. १६ रोजी इस्पितळात त्याचे निधन झाले. सोमनाथ याचा भाऊ गौरेश काणकोणकर यानी यासंबंधी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

