भर दुपारी आस्थापनात घुसून ९.५० लाखांचा ऐवज लुटला

0
65

काल दुपारी निलेश रायकर यांच्या मालकीच्या कचेरीवर दरोडा घातला. त्यावेळी जिंतेद्र लोटलीकर हा एकच कर्मचारी उपस्थित होता. अज्ञात तरुण आत घुसले व त्यांनी जितेंद्रच्या तोंडावर ज्याकीट घालून जखमी होईपर्यंत दंडुक्याने मारहाण केली. त्यात तो जखमी होऊन पडल्यानंतर कपाटातील व टेबलाच्या खणातील दोन लॅपटॉप, .५० लाख रुपयांचे भारतीय चलन, ४८५० युएस डॉलर मिळून ९.५० लाख रुपये व ऐवज घेऊन ते पळून गेले. काही वेळाने मालक येताच जखमी अवस्थेत जितेंद्र पडलेला दिसला असता त्याला तात्काळ उपचारासाठी अपोलो व्हिक्टरमध्ये दाखल केले आहे.

पंधरा दिवसांमागे पाचजण या कचेरीत येऊन माहिती घेऊन गेले होते व त्यातील आज दोघेजण सकाळी येऊन गेल्याचे जखमी जितेंद्रने पोलिसांना सांगितले. हे वृत्त समजताच उपअधीक्षक मोहन नाईक, पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजू राऊत देसाई हे घटनास्थळी पोहचले व तपास सुरू केला. या कचेरीत सी. सी. टीव्ही बसविले नव्हते.