उपलब्ध माहितीनुसार ‘अधिनान’ नावाचे जहाज संशयास्परित्या समुद्रामध्ये भरकटत असल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना दुपारी दिसून आले. लगेच त्यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्टची जहाजे ओढण्याची बोट घेऊन ट्रॉलरला बंदरात आणले. यावेळी ट्रॉलरवर १७ कर्मचारी होते. पैकी केवळ १२ जणांकडे ओळखपत्रे आढळली. ते सर्व तामीळनाडूतील असल्याचे दिसून आले. इतर जणांकडे ओळखपत्रे नसल्याचे दिसून आल्यानंतर तटरक्षक दलास कळविण्यात आले.
तटरक्षक दलाने चौकशी करून ट्रॉलर मुरगाव बंदरात नांगरण्यास सांगितला व पाच जणांना मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. अटक केलेल्यांची नावे ऑस्कर शेल्टन (२४), अभिनाश लिओ (२०), दनेश खुरीस (५८), किथी उनाराज (२०), आणि प्रबिसान वालेरीयान (१९) अशी आहेत. ट्रॉलर समुद्रात बंद पडल्याचे चौकशीत सांगण्यात आल्याचे कळते. अधिक तपास चालू आहे.