Home बातम्या ब्रिटिश नागरिकाकडून 15 लाखांचे ड्रग्स जप्त

ब्रिटिश नागरिकाकडून 15 लाखांचे ड्रग्स जप्त

0

गुन्हा अन्वेषण विभागाने वागातोर येथे टाकलेल्या छाप्यात सुमारे 15 लाखांचा अमलीपदार्थ जप्त केला. ब्रिटिश नागरिक जॉन पार्किंन्सन (52, सध्या रा. बादे-आसगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमलीपदार्थाच्या देवाणघेवाणीसाठी संशयिताने वापरात आणलेली मोटरसायकल (क्र. एमएच-04-एचडब्लू-8546) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या छाप्यात एलएसडी पेपर 1.194 ग्रॅम, तसेच एलएसडी 4.33 लिक्विड मिळून सुमारे 15 लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त केला. संशयित जॉन पार्किंन्सन यांच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची रवानगी स्थानिक पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक नारायण चिमुरकर व त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.