बेपत्ता तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

0
5

रविवारपासून बेपत्ता असलेल्या नुवेे-श्र्‌रीस्थळ येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल संशयास्पद स्थितीत कोर्नमळे-भाटपाल या ठिकाणी नदीत आढळून आला. शेखर वेळीप असे सदर तरुणाचे नाव असून, तो फ्लिपकार्ट कंपनीत कामाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारपासून शेखर वेळीप हा बेपत्ता होता. घरातून बाहेर पडताना आपल्या मामाच्या घरी जातो, असे सांगून तो निघाला होता. मात्र त्याचा मृतदेह सापडल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. शेखर याचा मृतदेह नदीत सापडला, तर त्याची दुचाकी भाटपाल येथे एका झाडाखाली सापडली. त्या दुचाकीच्या चाव्या डिकीमध्ये सापडल्या. तसेच त्याच्या तोंडावर बर्‍याच जखमा आढळल्या आहेत, अशी माहिती कोणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सेसाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे. शेखर याच्या पश्‍चात वडील आणि भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, सोमवारी दुमाणे-आगोंदा या ठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही, त्याचा मृतदेह मडगावच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.