Home बातम्या बेनझीर हत्येप्रकरणी मुशर्रफविरुद्ध आरोपपत्र

बेनझीर हत्येप्रकरणी मुशर्रफविरुद्ध आरोपपत्र

0

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भूत्तो यांच्या २००७ साली झालेल्या हत्येप्रकरणी काल पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ व अन्य सहा जणांविरुद्ध आरोपपत्र ठेवण्यात आले. याप्रकरणी कडक सुरक्षा व्यवस्थेत मुशर्रफ यांना कोर्टात हजर करण्यात आले.

मुशर्रफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, हे राजकीय षड्‌यंत्र असल्याचे सांगितले. बेनझीर यांची हत्त्या रावळपिंडी येथे २००७ साली निवडणूक प्रचारसभे दरम्यान आत्मघाती बॉम्बहल्ल्यात झाली होती. यावेळी मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्रपती होते.