बेताळभाटी समुद्रावर मच्छीमारीस गेलेल्या होड्या उलटल्याने समुद्रात फेकल्या गेलेल्या आठजणांना वाचविण्यात दुसर्या एका होडीतील मच्छीमारांना यश आले.
याबाबत माहिती अशी की, मुसळधार पावसात व समुद्राला तुफान आले असताना कासांवली येथील दोन मच्छीमारी होड्या घेवून मासे मारण्यासाठी समुद्रात गेले होते. दुपारी बेतालभाटी येथे मोठमोठ्या लाटांच्या धडकेने एक होडी उलटून आठ खलाशी समुद्राच्या पाण्यात पडले. त्या लोकांना दुसर्या होडीतील मच्छीमारी लोकांनी दोर्या व इतर वस्तूंनी त्यांना किनार्यावर सुखरूप आणण्यात यश मिळविले. मच्छीमारी खात्याने समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली असताना व तुफानी वातावरण असताना ते मासळी मारण्यासाठी गेले होते. पण सुदैवाने बचावले.