प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेत तो बेकायदेशीरपणे क्रॉस उभारण्यात आला होता व तो मोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेऊन जिल्हाधिकार्यांनी कळविले होते.
काल सकाळी प्राधिकरणाने तो मोडून टाकला. त्यानंतर मासळी व फळभाज्या विक्रेत्यांनी तो मोडलेला पाहताच संताप व्यक्त केला व काही वेळ वातावरण तंग झाले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी व्हेनासियो फर्तादो यांची त्यांनी भेट घेतली. जिल्हाधिकार्यांनी त्यांच्याशी चर्चा केली व आपण एसपिडीएशी संपर्क साधून त्या बाबतीत विचारपूस करतो असे सांगितले.
शिवाय प्राधिकरणाची आणखी कुठेही मोकळी जागा असल्यास तेथे तो उभारता येईल की काय याबद्दल माहिती मिळवून घेतो. परंतु प्राधिकरण्याच्या अधिकार्यांना ती जागा घेण्याचा अधिकार नसून त्यासाठी प्राधिकरण्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. त्या बैठकीनंतर ते परतले व दिवसभरासाठी बाजार बंद ठेवला. हल्लीच विनापरवाना तो क्रॉस उभारला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हमरस्त्यालगत वा सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळे उभारले गेल्यास ते मोडून टाकण्याचा आदेश दिलेला आहे व जिल्हाधिकार्यांनी दक्षिण गोव्यातील अशा सर्व जागांची पाहणी करून अहवाल मागितला आहे. हल्लीच अचानक उभारलेल्या त्या क्रॉस विरुद्ध एसपिडीएने जिल्हाधिकार्याकडे तक्रार केली होती. व जिल्हाधिकार्यानी तो मोडून टाकण्याचा आदेश दिला होता.