बेकायदा धर्मांतरण प्रकरण डॉम्निक डिसोझा याला अटक

0
17

म्हापसा पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली बिलिव्हर्सच्या डॉम्निक डिसोझा याला अटक केली. या प्रकरणी आणखी एकास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुचेली-म्हापसा येथील प्रकाश कृष्ण खोबरेकर (वय ५७) यांनी दाखल केलेल्या बेकायदा धर्मांतराच्या तक्रारीच्या अनुषंगाने म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब यांनी ही कारवाई करत डॉम्निक डिसोझा याला अटक केली.

संशयित डॉम्निक डिसोझा याने प्रकाश खोबरेकर यांना धर्मांतरासाठी धमकावले. तसेच त्यांना संशयिताने सांगितलेला आणि प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी १५३ अ, २९५ अ, ५०६ (२), भा. दं. सं. ३४ चे कलम ३, ४ नुसार गुन्हा नोंदवला आहे.