निज निर्यातीसंदर्भात सरकारने घालून दिलेल्या दंडकांचे काटेकोर पालन करावे असा इशारा मुरगाव पोर्ट ट्रस्टने गोवा लोहखनिज निर्यातदार संघटनेला दिला आहे.
पोर्ट ट्रस्टचे वाहतूक व्यवस्थापक एन. वैयापुरी यांनी यासंदर्भात सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक बैठक बोलावली असून मुरगाव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष पी. मारा पंडियन, तसेच निर्यातदार संघटनेच्या पदाधिकार्यांदरम्यान या संदर्भात चर्चा होणार आहे.